जगातील सर्वात लहान हवाई प्रवास, जो फक्त 40 सेकंदांमध्ये संपतो

जगातील सर्वात लहान हवाई प्रवास, जो फक्त 40 सेकंदांमध्ये संपतो. कुठून कुठपर्यंत आहे हा प्रवास? नेमकं कारण काय?

| Updated on: Apr 06, 2026 | 4:01 PM
1 / 5
तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी फ्लाइट फक्त काही सेकंदांत पूर्ण होऊ शकते? ऐकायला आश्चर्य वाटेल पण जगात अशी एक फ्लाइट आहे जी अवघ्या 40 ते 60 सेकंदांत आपला प्रवास पूर्ण करते.

तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी फ्लाइट फक्त काही सेकंदांत पूर्ण होऊ शकते? ऐकायला आश्चर्य वाटेल पण जगात अशी एक फ्लाइट आहे जी अवघ्या 40 ते 60 सेकंदांत आपला प्रवास पूर्ण करते.

2 / 5

ही अनोखी फ्लाइट ऑर्कनी बेट येथे चालते. विशेष म्हणजे ही सेवा दोन छोट्या बेटांदरम्यान वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे करीता दिली जाते.

3 / 5

या फ्लाइटचा कालावधी साधारणपणे 40 ते 60 सेकंद इतकाच असतो. म्हणजेच, अनेक वेळा प्रवासापेक्षा टेकऑफ आणि लँडिंगसाठी लागणारा वेळ जास्त असतो.

4 / 5

हवामान अनुकूल असेल, विशेषतः जोरदार वाऱ्यामुळे, ही फ्लाइट यापेक्षाही कमी वेळात पूर्ण होते. ही फ्लाइट अधिकृतपणे जगातील सर्वात लहान कमर्शियल फ्लाइट म्हणून ओळखली जाते. इतक्या कमी अंतरावरही हवाई सेवा सुरू ठेवण्यामागे स्थानिक लोकांच्या दैनंदिन गरजा महत्त्वाच्या आहेत.

5 / 5

या बेटांवर राहणाऱ्या लोकांसाठी ही सेवा वेळ वाचवणारी आणि अत्यंत उपयुक्त ठरते. ही अनोखी फ्लाइट केवळ प्रवासाचे साधन नाही तर विमानवाहतुकीतील एक विलक्षण उदाहरण आहे. इतक्या कमी अंतरासाठीही हवाई सेवा चालवली जाऊ शकते हेच या फ्लाइटमुळे सिद्ध होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us