हायला… असाही एक देश… जिथल्या तरुणींना आवडतात ढेरपोटी पोरं, कारण ऐकून येडेच व्हाल

जगात सिक्स-पॅक ट्रेंड असताना, इथिओपियाच्या बोडी जमातीत सौंदर्याची अनोखी व्याख्या आहे. मोठे पोट असलेले पुरुष येथे देखणे व शक्तिशाली मानले जातात. 'केल उत्सवा'साठी ते दूध-रक्त पिऊन वजन वाढवतात. ६ महिने बंदिस्त राहून फक्त खाणे-झोपण्यावर भर देतात. विजेता नायक बनतो, ज्याला मुली जोडीदार म्हणून निवडतात.

| Updated on: Mar 31, 2026 | 2:46 PM
1 / 5
सध्या जगभरात सिक्स-पॅक ॲब्सचा ट्रेंड आहे, तिथे फिट बॉडीसाठी घाम गाळला जातो. मात्र असतानाही जगात अशी एक जागा आहे, जिथे सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे.  इथिओपियाच्या 'बोडी जमाती'मध्ये सौंदर्याची व्याख्या मात्र पूर्णपणे निराळी आहे. तिथे ज्या पुरुषाचे पोट सर्वात जास्त सुटलेलं, मोठं असतं, त्याला सर्वात देखणा आणि शक्तिशाली मानलं जातं.

2 / 5
एवढंच नव्हे तर या जमातीचे पुरुष आपलं पोट मोठं करण्यासाठी एक धक्कादायक आहार पद्धती अवलंबतात. ते गाईच्या दुधात गाईचं ताजं रक्त मिसळून पितात. हे 'एनर्जी ड्रिंक' त्यांना लवकर वजन वाढवण्यास मदत कंते, ज्यामुळे त्यांचं पोटं मोठं होतं.

3 / 5
पण ही काही सामान्य स्पर्धा नाही. 'केल उत्सवा'मध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांना 6 महिने एका झोपडीत बंदिस्त राहावं लागतं. या काळात त्यांना कोणतेही शारीरिक काम करण्यास मनाई असते; त्यांचे एकमेव लक्ष्य म्हणजे खाणं, झोपणं आणि वजन वाढवणं, त्यावरच ते फोकस करतात.

4 / 5
उत्सवाच्या दिवशी, हे पुरुष आपल्या शरीराला राख आणि माती लावून नृत्य करतात. ज्याचं पोट सर्वात मोठं आणि फुगलेलं असतं, त्याला जमातीचा 'नायक' आणि 'सुपरमॉडेल' म्हणून घोषित केलं जाते. विजेत्याला समाजात एक अत्यंत सन्माननीय स्थान मिळते.

5 / 5
बोडी जमातीच्या मुली मोठ्या, पोट सुटलेल्या पुरुषांशी लग्न करण्यासाठी वेड्या असतात. इथे, पोटाचा आकार हीच पुरुषत्वाची ओळख मानली जाते. जो पुरूष जिंकतो, त्याला आपला जोडीदार बनवण्यासाठी मुलींमध्ये चढाओढ लागते. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Follow Us