
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सुरू असलेल्या पाच कसोटींच्या मालिकेत टीम इंडियाने 2-1 ने विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात कसोटी सामन्यात टीम इंडियाने 434 धावांनी विजय मिळवला.

तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने नाबाद 214 धावांची द्विशतकी खेळी केली. या सामन्यात यशस्वी जयस्वालाने सलग तीन सिक्सर मारले होते. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. यावर जयस्वाल पाहा काय म्हणाला.

मी चांगल्या फॉर्ममध्ये बॅटींग करत होतो. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की जर बॉल माझ्या टप्प्यात आला की मी शॉट्स मारणार. अँडरसन हा जागतिक दर्जाचा बॉलर आहे. मी माझ्या खेळीचा आनंदल घेतला आणि माझं बेस्ट देण्याचा मी प्रयत्न करत असल्याचं यशस्वी जयस्वाल म्हणाला.

यशस्वी जयस्वाल याने 234 चेंडूत नाबाद 214 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 14 चौकार तर 12 षटकार मारले. या द्विशतकासह यशस्वीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यातही संघाला त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. चौथा कसोटी सामना येत्या 23 फेब्रुवारीला सुरू होणार आहे.