
मोबाईलमध्ये शून्य बॅलन्स असतानाही तुम्ही कॉल करू शकता आणि मेसेज पाठवू शकता हे तुम्हाला माहित आहे का? बॅलन्स तर सोडाच, तुम्हाला सिम किंवा नेटवर्कचीही गरज लागणार नाही. हे अगदी सहद शक्य आहे. आज आपण स्मार्टफोनमधील "बीकन लिंक" नावाच्या एका खास फीचरबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही सिम, नेटवर्क किंवा रिचार्जशिवाय तासन्तास बोलू शकता आणि मेसेजसही पाठवू शकता. ही टेक्नॉलॉजी नेमकी काय आणि कशी काम करते ते जाणून घेऊया.

खास फीचर : हे एक खास फीचर आहे जे वेगवेगळे ब्रँड त्यांच्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या नावांनी देतात. हे फीचर सर्व स्मार्टफोनवर उपलब्ध नाही, परंतु बहुतेक चिनी फोनवर ते उपलब्ध आहे. तसेच, OnePlus, Oppo आणि Realme स्मार्टफोन्समध्ये Beacon Link या नावाने हे फीचर दिले जाते. Infinix आणि Tecno स्मार्टफोन्समध्ये या फीचरला Ultra Link असे म्हणतात. शिवाय, हे फीचर Vivo फोन्समध्ये देखील उपलब्ध आहे. जरी प्रत्येक ब्रँडने त्याला वेगळे नाव दिले असले तरी त्याचे काम सारखेच आहे. हे फीचर असेल तर तुम्ही सिम कार्ड किंवा नेटवर्कशिवाय एकमेकांना कॉल करू शकता. पण या फीटरलाही काही मर्यादा आहेत.

वर उल्लेख केलेल्या स्मार्टफोन ब्रँडमध्ये सिम कार्ड किंवा नेटवर्कशिवाय कॉल करण्याची क्षमता आहे, यात काही शंका नाही, परंतु ते फक्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काम करतं. तुम्ही ते सिम किंवा नेटवर्कशिवाय वॉकी-टॉकी म्हणून विचार करू शकता. जर तुम्ही रेंजमध्ये असाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी याचा वापर करू शकता. हे फीचर वापरताना लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकाच ब्रँडच्या फक्त दोन स्मार्टफोनवरच वापरले जाऊ शकते.

सोप्या शब्दांत सांगायचे तर, जर तुम्ही OnePlus फोनवर हे फीचर वापरत असाल, तर दुसऱ्या व्यक्तीकडे देखील OnePlus फोन असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट राहू शकता. त्याच्याशी तुमचा संपर्क होऊ शकतो आणि चांगलं नेटवर्कही मिळू शकतं. या नव्या फिचर्सचा हा फायदा आता सर्वांनाच घेता येणार आहे.

हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. नंतर मोबाइल नेटवर्कवर टॅप करा आणि नंतर Beacon Linkवर टॅप करा. या अत्यंत सोप्या पद्धतीमुळे तुमचा प्रोसेजचा एक टप्पा पूर्ण होतो. त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेज करायची आहे. ते करणं अत्यंत सोपं आहे. त्यानंतर तुम्ही मोठा चमत्कार पाहाल.

नंतर बीकन लिंक फीचर चालू करा. आता तुम्ही हे फीचर फक्त तुमच्या संपर्कांसाठी वापरायचे की ते सर्वांसाठी चालू ठेवायचे हे निवडू शकता. या सोप्या गोष्टीमुळे तुम्ही नेटवर्कमध्ये याल. दुसऱ्याशी तुमचा कनेक्ट होईल. पण हा कनेक्ट चालू ठेवायचा की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असेल. मात्र, ही ट्रिक्स समोरच्या व्यक्तीकडे नसेल तर तुम्ही कनेक्ट होऊ शकणार नाही.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेंजमधील असे डिव्हाईस दिसतील ज्यात बीकन लिंक फीचर चालू आहे आणि तुम्ही त्यांना सहजपणे कॉल किंवा मेसेज करू शकता. हे नवं फिचर तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय झालं आहे. नव्या फिचरद्वारे मित्रांशी कनेक्ट होण्याकरता सर्वचजण उत्सुक झाले आहेत. तुम्हीही हे फिचर्स ट्राय करू शकता.