तुमच्या 3 सवयी अत्यंत घातक; 5 वर्षांत वाढू शकतो हार्ट अटॅकचा धोका, तज्ज्ञाने दिली महत्त्वाची माहिती
तुमच्या तीन सवयी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. हार्ट अटॅकपासून वाचवण्यासाठी तीन सवयी आतापासून सोडल्या पाहिजे.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका फक्त ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना होऊ लागला आहे.
चुकीची जीवनशैली आणि तीन वाईट सवयींमुळे नागरिकांमध्ये हृदयविकाराचा वाढू लागला आहे. या विकारापासून वाचण्यासाठी 3 चुकीच्या सवयीविषयी आरोग्य तज्ज्ञाने महत्त्वाची माहिती दिली.
तुमच्या आहारात दररोज तळलेले पदार्थ, अल्ट्रा प्रोसेस्ड, हाय कार्ब्स, पाकीटबंद वस्तूंचा समावेश असेल. हे पदार्थ तुमच्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. या जंक फूडचं सेवन केल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
तुम्ही कधी रात्रभर जागरण करता, तर कधी लवकर झोपी जाता. झोपेच्या चुकीच्या वेळांमुळे हृदयावर परिणाम होण्याची भीती आहे. तुम्ही झोपेच्या वेळा वारंवार बदलल्याने कॉर्टिसोलच्या पातळीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तसेच हृदयाच्या ठोक्यांमध्येही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. यामुळे ही बाब हृदयाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
तुम्ही दररोज धूम्रपान करण्याची सवय असेल, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका सर्वाधिक वाढतो. पाच जणांपैकी एका व्यक्तीच्या हृदयविकाराला धूम्रपान जबाबदार असते. तुम्ही दिवसातून एक सिगारेट ओढली तरी हृदयविकाराचा धोका दुप्पट होतो.