Adnaan Shaikh : ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांनी आपल्या आया-बहि‍णींना…बायकोच्या हिजाब सक्तीवर अभिनेता अदनानने दिलं असं उत्तर

Adnaan Shaikh : सोशल मीडिया इंफ्लुएंसर आणि अभिनेता अदनान शेखने वर्ष 2024 मध्ये गर्लफ्रेंड सोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. अदनानची पत्नी हिंदू होती. निकाहच्या आधी तिने धर्म बदलला. इस्लाम कबूल केला.

| Updated on: Mar 17, 2026 | 3:42 PM
1 / 5
अदनानच्या लग्नावरुन खूप वाद झालेला. लोकांनी त्याच्यावर पत्नीला धर्म परिवर्तनासाठी भाग पाडल्याचा आरोप केलेला. हिंदू धर्म सोडून मुस्लिम बनलेली अदनानची पत्नी बुर्का-हिजाब घालते. तो पर्दा करते. लग्नातही तिने चेहरा दाखवला नव्हता.

2 / 5
अदनानला एका इंटरव्यूमध्ये विचारलं की, त्याने पत्नीला हिजाब परिधान करण्यासाठी भाग पाडलय का? त्यावर अदनानने स्पष्टीकरण दिलं. "लोकांना बोलू दे. माझं आयुष्य आहे. मी माझ्या हिशोबाने जगणार. ज्या लोकांना प्रॉब्लेम असेल, त्यांनी आपल्या आया-बहि‍णींना दाखवावं. मी माझी बायको कोणाला दाखवणार नाही" असं अदनानने उत्तर दिलं.

3 / 5
"ज्या महिला पर्दा करणार नाहीत, त्यांच्या नशिबात जन्नतची हवा सुद्धा नसेल. मी मुलगा आहे. मला माहितीय पुरुष महिलांकडे कुठल्या नजरेने बघतात" असं अदनान म्हणाला. "आमच्या धर्मात हे सुद्धा म्हटलय की, महिलांना कळलं की पुरुष त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतात, तर त्या स्वत:ला पूर्ण झाकून घेतल्याशिवाय बाहेरही पडणार नाहीत" असं अदनान म्हणाला.

4 / 5
अदनानने त्याच्या बायकोच्या धर्म परिवर्तनावर सुद्धा मौन सोडलं. "माझ्या बायकोने लग्नाच्या आधी धर्म बदलला. भारतात सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणी दुसऱ्यावर जबरदस्ती करुन काही करु शकत नाही"

5 / 5
अदनानच्या बायकोचं खरं नाव रिद्धि आहे. लग्नाच्यावेळी धर्म बदलून ती आएशा बनली. ती नेहमी स्वत:ला झाकून ठेवते. कधीच कोणाला आपला चेहरा दाखवत  नाही.

Follow Us