
प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

अरमान मलिक हा लवकरच तिसरे लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. आता त्यावरच अरमान मलिक याने मोठे भाष्य केले.

अरमान मलिक म्हणाला की, आता तिसऱ्यांदा प्रेमात नाही पडणार. नेहमीच एकसारख्या गोष्टी नाही होऊ शकत. शूटिंगवेळी वेगवेगळ्या मुली भेटतात.

जे काही व्हायचे ते अगोदर झाले आता नाही होणार. पुढे अरमान मलिक म्हणाला, मी फक्त दोन बायका आणि चार लेकरंच सांभाळू शकतो, त्यापेक्षा जास्त नाहीच.

आता माझे वयही झाले असून प्रेमात पडायचे दिवस गेले आहेत. आता अरमान मलिक याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.