
युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर अरमानची पत्नी कृतिका मलिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती चाहत्यांना 'गुड न्यूज' देताना दिसतेय.

कृतिका तिची सेकंड प्रेग्नंसी जाहीर करते. आपल्या व्लॉगच्या माध्यमातून ती फॉलोअर्सना गोड बातमी देताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अरमान जल्लोष साजरा करण्याबद्दल बोलतो. त्यानंतर कृतिका तिची सवत पायलला खुशखबर सांगते.

कृतिकाच्या गुड न्यूजबद्दल समजताच पायलला आश्चर्याचा धक्का बसतो. तिला आधी कृतिकाच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. नंतर ती आनंदाने नाचू लागते.

पायल कृतिकाला म्हणते, "तू चिंता करू नकोस, मी बाळाची काळजी घेईन. मलिक कुटुंबात येणारं हे पाचवं बाळ असेल." कृतिकाला याआधी एक मुलगा आहे. तर पायलची तीन मुलं आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी या शोमध्ये सहभागी झाला होता. या तिघांमुळे शोची चांगलीच चर्चा झाली होती. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर कृतिका गुड न्यूजबद्दल बोलत असल्याने, नेटकऱ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एकीकडे नेटकऱ्यांनी कृतिकाच्या प्रेग्नंसीबद्दल प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे तिच्या या व्हिडीओबद्दल काही नेटकऱ्यांनी संभ्रम व्यक्त केला. कृतिकाचा हा जुना प्रँक व्हिडीओ असल्याचं म्हटलं जातंय.

तिने तिच्या मुलाच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतर हा प्रँक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता पुन्हा एकदा तोच व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.