
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फिक्सिंग केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र हा आरोप कोणी आणि का केला आहे जाणून घ्या.

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मधून पाकिस्तान संघ सुपर-8 फेरीमध्ये स्थान मिळवू शकला नाही. पाकिस्तान संघाचा यजमान अमेरिका संघाने पराभव केला होता.

पाकिस्तान संघाला अशा प्रकारे मानहारिक पराभव स्कीकारावा लागला. अशातच एका यू-ट्यूबरने बाबर आझम याच्यावर गंभीर आरोप केला आहे.

बाबरकडे 8 करोडोची गाडी, दुबई आणि अमेरिकेमध्ये फ्लॅट ही संपत्ती अमेरिका, आयर्लंड या संघांविरूद्ध फिक्सिंग केल्यावरच येऊ शकते, असा दावा आरोप करणाऱ्या यू-ट्यूबरने केला आहे.

पाकिस्तानी क्रीडा पत्रकारांनी बाबर आझमवर केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीर पीसीबीला या यू-टयूबरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.