
यजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केले. आता देखील धनश्री चर्चेत आली आहे.

सध्या सोशल मीडियावर धनश्री हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धनश्री हिने मंगळसूत्र घातलं आहे आणि नव्या नवरीप्रमाणे नटली आहे. फोटोमुळे धनश्री पुन्हा चर्चेत आली आहे.

नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धनश्री लाल साडीमध्ये सुंदर दिसत आहे. धनश्री हिच्या सिंदूर आणि मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

फोटो पोस्ट करत धनश्री हिने कॅप्शनमध्ये 'व्हिंटेज वाईब्स...' असं लिहिलं आहे. तर अनेकांनी कमेंटमध्ये सिंदूर आणि मंगळसूत्र कोणाच्या नावाचं... असा प्रश्न धनश्री हिला विचारलेला आहे.

धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धनश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.