
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी 23 जून रोजी लग्न केलं. या दोघांच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत सोनाक्षीच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती. इतकंच काय तर तिचा एक भाऊ लग्नालाही उपस्थित नव्हता. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला आता दीड महिना पूर्ण झाला आहे.

सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकताच झहीरने तिच्यासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये त्याने सोनाक्षीबद्दल एक तक्रारसुद्धा केली आहे.

सोनाक्षी आणि झहीर हे दोघं नुकतेच एका पार्टीला गेले होते. सोनाक्षी वेळेचं काटेकोर पालन करत असल्याने तिने झहीरला पार्टीला एक तास आधीच नेलं होतं. त्यामुळे तो एक तास पार्टीत घालवणं झहीरसाठी खूप कठीण झालं होतं.

पार्टीत एक तास लवकर गेल्यानंतर झहीरने पत्नी सोनाक्षीसोबतचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला. त्यावर त्याने लिहिलं, 'वेळ घालवतोय, कारण नेहमीप्रमाणे माझ्या प्रिय पत्नीमुळे आम्ही एक तास आधीच इथे पोहोचलोय.'

पतीच्या या तक्रारीबद्दल सोनाक्षीनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं, 'तरीसुद्धा तुला मजा आली ना? तेसुद्धा माझ्यामुळे..' या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.