Zaheer Khan-Sagarika Ghatge : पती झहीर खानच्या बाहुपाशात दिसली अभिनेत्री सागरिका घाटगे, रोमँटिक क्षणांचे फोटो पोस्ट
Zaheer Khan-Sagarika Ghatge : प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे नेहमी चर्चेत राहणारं जोडपं आहे. त्यांनी आता काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यातून त्यांचा रोमँटिक अंदाज दिसतो.

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि माजी क्रिकेटपटू झहीर खान यांनी इटली मधल्या वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. दोघांनी तिथली सुंदर निसर्गरम्य ठिकाणं दाखवली आहेत. झहीर-सागरिकाने टस्कनमध्ये काही शांत, निवांत क्षण घालवले. हा अनुभव त्यांनी इन्स्टावर शेअर केलाय.
टस्कनीत उन्हात घालवले काही दिवस, डोंगरांमध्ये सायकलिंग, Ghizzano च्या छोट्याशा ट्रिपमध्ये टेस्टी जेवण..सर्व शानदार होतं, असं इन्स्टा पोस्टमध्ये सागरिकाने म्हटलय.
जेवणाच्या प्रत्येक डिशमध्ये ट्रफलची टेस्ट होती. निसर्गरम्य वातावरणात स्विमिंग करणं खास होतं. तिथलं वातावरण अल्हादायक होतं. दिवसाचा उजेड आणि हवेत हलका थंडावा होता.
हैराण व्हायला होतं, ही सगळी एस्टेट 2700 एकरमध्ये पसरलेली आहे, इथला जुना किल्ला सुद्धा मेडिसी कुटुंबाकडे होता. तो खूप चांगल्या पद्धतीने जतन करुन ठेवला आहे असं सागरिका लिहिते.
एका फोटोत झहीरने त्याच्या लेडीलवला बाहुपाशात घेतलं आहे. दोघांची केमिस्ट्री दमदार आहे. फॅन्सनी त्यांना एडोरेबल म्हटलं आहे. हे कपल वेकेशनला कॅजुअल लूकमध्ये दिसलं. त्यांचा मुलगा फतेह सिंह खानची क्यूट झलक दिसली.