Zaheer Khan: आधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता झहीर खानला लागली CSK कडून मोठी लॉटरी! हेड कोच झाल्यावर असं काय म्हणाला?
Zaheer Khan On CSK : झहीर खान आता चेन्नई सुपर किंग्जचा नवीन कोच म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. झहीर खानने आता त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर गोलंदाज झहीर खान चर्चेत होता. दोन दिवसांपूर्वी झहीर खानने आपल्या परिवारासह मुंबईतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला हजेरी लावली होती.
झहीर खानला चेन्नई सुपर किंग्जने थेट हेड कोचपदाची ऑफर दिली. हेड कोच झाल्यानंतर झहीर खानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
झहीर खान म्हणाला, "आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एकाचा भाग असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. एक क्रिकेटपटू म्हणून आतापर्यंत मी मैदानात चेन्नईविरुद्ध खेळलो आहे आणि त्या सामन्यांचा मी मनसोक्त आनंद घेतला आहे."
"चेपॉकवर तिथल्या 'सुपर फॅन्स'मुळे निर्माण होणारे वातावरण अनुभवाला अधिकच खास बनवते. इतका गौरवशाली इतिहास असलेल्या या प्रतिष्ठित संघाशी जोडले जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, " असे देखील झहीर खान म्हणाला आहे.
झहीर खानचे नाव जरी हेड कोचपदी जाहीर झाले असले तरी चेन्नईविरुद्ध झहीर खानचा रेकॉर्ड खास नव्हता. त्याने 2015 मध्ये धोनीला आऊट केले होते. त्यावेळी धोनी त्याच्यावर खूश झाला होता. अशातच धोनीच्याच सल्ल्याने आता झहीर खान हेड कोच झाल्याचे समजत आहे.