
आता अनलॉकनंतर सगळ्या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आपले लाडके कलाकारसुद्धा नव्या उमेदीसह तयार आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'डान्सिंग क्वीन' या शोमध्ये परीक्षिकाची भूमिका साकारत आहे. ती या शो संदर्भातील गंमती जमती सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता तिनं या आठवड्यासाठी खास लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तिच्या मनमोहक सौंदर्यानं ती नेहमीच 'डान्सिंग क्वीन' च्या सेटवर सगळ्यांचं लक्ष वेधत असते.