
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

गौतमी आता ‘माझा होशील ना’ या मालिकेतून आपल्या उत्तम अभिनयाची छाप प्रेक्षकांसमोर पाडत आहे. या मालिकेनं गौतमीला एक वेगळी ओळख दिली असं म्हणायला हरकत नाही.

गौतमी आणि मृण्मयी या दोघी बहिंणींमध्ये भरपूर कला रुजलेल्या आहेत. मृण्मयी उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र आता ती दिग्दर्शनातही उतरली आहे. तसंच गौतमी उत्तम गायिका आहे.

दोघी बहिंणीमधील प्रेमाची झलक नेहमीच प्रेक्षकांना पाहायला मिळते. मात्र आता एका पुरस्कार सोहळ्यात दोघींनी हटके अंदाजात हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

सुंदर सुताच्या साड्या परिधान करुन त्या या पुरस्कार सोहळ्याला पोहोचल्या होत्या. आता त्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.