
मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात 2022 मध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. वर्षाच्या पहिल्या तिन महिन्यात काहींना आरोग्याच्या समस्या असू शकतात. वर्षाच्या उर्वरित भागातही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

मिथुन राशीच्या लोकांना या वर्षी करिअरमध्ये प्रचंड नुकसान आणि नंतर फायदा होईल. संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. या काळात आरोग्याशी निगडीत समस्या देखील येवू शकतात.

कर्क राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष आव्हानात्मक असू शकते. एप्रिलमध्ये शनीच्या राशी बदलामुळे आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो. या काळात धिराने काम करा.

हे वर्ष धनु राशीच्या लोकांना मानसिक तणावाचे शिकार बनवेल. याबाबत बोलताना दक्षता न घेतल्यास जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. या काळात कुटुंबातील कोणाशीही कडू न बोललेलेच बरे.