“टीएमसीचे 3 आमदार, 50 नगरसेवक भाजपात, आणखी 7 टप्प्यात भरती होणार”

| Updated on: May 28, 2019 | 5:21 PM

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केलंय. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. दिल्लीत या नेत्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. 2017 मध्ये टीएमसीतून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या […]

टीएमसीचे 3 आमदार, 50 नगरसेवक भाजपात, आणखी 7 टप्प्यात भरती होणार
Follow us on

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केलंय. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. दिल्लीत या नेत्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. 2017 मध्ये टीएमसीतून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या आमदाराचाही समावेश आहे. बीजपूरचे आमदार शुभ्रांशू रॉय, आमदार तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं.

भाजप आणि टीएमसीमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षांमध्ये हिंसाचारच्या घटना अनेकदा घडत असतात. पण ममता बॅनर्जींच्या आक्रमकतेला फोडाफोडीने उत्तर देण्याचा प्लॅन भाजपने केल्याचं दिसतंय. लोकसभेपूर्वी टीएमसीचे सात ते आठ खासदार भाजपात आले होते.

बंगालमधील काचरापारा महापालिकेचे 17 नगरसेवक भाजपात सहभागी झाले. यामध्ये महापौर आणि उपमहापौराचाही समावेश आहे. एकूण 26 सदस्य असलेल्या या महापालिकेतील 17 सदस्य भाजपात आल्याने इथे भाजपची सत्ता आली आहे. याशिवाय आणखी दोन महापालिकांवरही भाजपने वर्चस्व मिळवलंय. तीन महापालिकांमधील 50 नगरसेवक भाजपात सहभागी झाले.

आमदार आणि नगरसेवकांनी भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. टीएमसी आणखी धक्के देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा पहिला टप्पा आहे. ज्या प्रमाणे निवडणुकीत सात टप्पे झाले होते, त्याचप्रमाणे आणखी सात टप्प्यांमध्ये भरती केली जाईल, अशी माहिती विजयवर्गीय यांनी दिली.