बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी

| Updated on: Nov 08, 2020 | 8:17 PM

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा दिल्ली खतरे में है; अब्दुल सत्तारांची टोलेबाजी
Follow us on

नाशिक : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर देशभरातील एक्झिट पोलने राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनचं सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले बिहारचा एक्झिट पोल एक्झॅक्ट ठरला की समजा ‘दिल्ली खतरे में है’. यातून त्यांनी बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास केंद्रातील मोदी सरकार देखील जाणार असल्याचा दावा केलाय (Abdul Sattar criticize Chandrakant Patil and Modi Government over Bihar Exit Poll).

अब्दुल सत्ता म्हणाले, “बिहारचा निकाल हा भाजपच्या राजकारणासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी एक वेगळी कलाटणी देणारा असेल. ही निवडणूक देशाच्या राजकारणात परिवर्तन करणारी राहील. एकदा हा एक्झिट पोल एक्झॅक्ट बसला, तर दिल्लीही ‘खतरे में है’.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून घेण्यात आलेली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट आणि राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड यावर बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली. “महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी देताना सर्व निकष पाहून यादी दिली आहे. त्यामुळे राज्यपाल महोदय त्याला नाकारतील असं मला वाटत नाही. राज्यपाल मंजुरी देतील. चंद्रकांत पाटील यांना भेट घेण्याचा चान्सच नसल्याने ते राज्यपालांच्या भेटीसाठी गेले,” असं मत सत्तार यांनी व्यक्त केलं.

“निवडणुकीसाठी अजून 4 वर्ष बाकी आहेत. ज्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही ते राजीनामा मागत आहेत. ते प्रत्येकाचाच राजीनामा मागत आहेत. त्यांच्या मागणीनुसार राजीनामा घेतला तर राजीनाम्याचे निकष बदलावे लागतील,” असाही टोला सत्तार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

मुंबईत विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या आंदोलनावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “सध्याचं सरकार मराठा बांधवांच्या बिलकुल विरोधात नाही. राज्य सरकारने दिलेलं आरक्षण टिकावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. काही लोक मराठा समाज आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी कृपया हे प्रयत्न करू नयेत.”

हेही वाचा :

तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतात काय?; अब्दुल सत्तार भडकले

फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

Abdul Sattar criticize Chandrakant Patil and Modi Government over Bihar Exit Poll