फक्त पाचच शब्द… अभिजीत दीपकेंची नवी पोस्ट; निवडणूक आयुक्तांना विचारला असा सवाल…

अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोगाला मतदार नोंदणी मोहिमेवरून घेरले आहे. 'तुम्ही सुरुवात का केली नाही?' असा सवाल त्यांनी विचारला. दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून मुंबईत देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

फक्त पाचच शब्द... अभिजीत दीपकेंची नवी पोस्ट; निवडणूक आयुक्तांना विचारला असा सवाल...
abhijit dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 5:32 PM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला घेरलं आहे. दीपके यांनी आज पुन्हा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. दीपके यांनी निवडणूक आयोगाला व्होटर रजिस्ट्रेशन कॅम्पेनवरून सवाल केले आहेत. तुम्ही आतापर्यंत याची सुरुवात का केली नाही? असा पाच शब्दांचा सवाल दीपके यांनी निवडणूक आयुक्तांना विचारला आहे. दीपके यांनी कालच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

निवडणूक आयोगाने एक खास कॅम्पेन सुरू केली आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव मतदार यादीत नसेल वा जानेवारी, एप्रिल, जुलै किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केली असेल तर तो मतदार यादीच्या कोणत्याही प्रकारच्या रिव्हिजनची वाट न पाहता मतदार म्हणून आपली नोंदणी करू शकतो, असं हे कॅम्पेन आहे. निवडणूक आयोगाने दबावात हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

 

काय केलं ट्विट?

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अभिजीत दीपके यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. मग तुम्ही आतापर्यंत का केलं नाही? असं या पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटलं आहे. दीपके यांच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासकरून सर्वचजण ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात तरुणांमध्येही मोठा असंतोष असल्याचं दिसून येत आहे.

अधिकारी काय म्हणाले?

दरम्यान, आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नियमानुसार मतदार याद्या नियमितपणे अपडेट करण्याच्या प्रक्रियेत योग्य व्यक्तीचं नाव नोंदवलं जाऊ शकतं. मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी भारताचा नागरिक असणं महत्त्वाचं आहे. सोबतच निर्धारित तारखेला वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. ज्या मतदारसंघात नाव नोंदवायचं आहे, तिथला तो रहिवाशी असणं आवश्यक आहे. नाही तर अपात्र घोषित केलं जाऊ शकतं.

2 ऑक्टोबर नंतर एल्गार

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राजीनामा नाही दिल्यास मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच हे आंदोलन मुंबईतच नव्हे तर देशाच्या इतर शहरांमध्येही छेडण्याचा इशारा त्यांनी दिल्याने ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us