माघार घेतल्याने भाजपच्या मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते चिडले, रडले आणि…

| Updated on: Oct 17, 2022 | 7:06 PM

मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

माघार घेतल्याने भाजपच्या मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते चिडले, रडले आणि...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या निवडणुकीत लक्षवेधी घडामोड घडली आहे. भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला आहे. मात्र, मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील भाजपाचे उमेदवार मागे घ्यावा असे आवाहन केले होते.

यानंतर भाजपने मुरजी पटेल यांना निवडणून अर्ज मागे घेण्याच्या सुचना केल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत.

मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पहायला मिळत आहे. मुरजी पटेल समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करत आपली नाराजी जाहीरपणे उघड केली.

पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं मुरजी पटेल समर्थकांमध्ये नाराजी असून ते चिडले आहेत. तर त्यांच्या काही समर्थकांच्या डोळ्यात अश्रू देखील पहायला मिळाले.

जनतेला निर्णय करु द्या, राज ठाकरेंच्या पत्रावर भाजपने निर्णय का घेतला? असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

नाराजी वक्त करण्यासाठी मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राज ठाकरे, फडणवीस आणि भाजप नेत्यांविरोधात मुरजी पटेल समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.