Aditya Thackeray : अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; तर नवनीत राणा आणि रवी राणांबाबत काय म्हणाले ठाकरे?

| Updated on: Apr 16, 2022 | 6:13 PM

युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा आज केलीय. आपण लवकरच अयोध्येत दर्शनासाठी जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray : अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; तर नवनीत राणा आणि रवी राणांबाबत काय म्हणाले ठाकरे?
आदित्य ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याची घोषणा
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाली आणि हिंदुत्वापासून दुरावली, अशी टीका भाजपसह विरोधकांकडून सातत्यानं केली जातेय. बाळासाहेबांची शिवसेना आता उरली नाही, असा निशाणाही विरोधक साधत असतात. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच उचलून धरल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आलीय. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा आज केलीय. आपण लवकरच अयोध्येत दर्शनासाठी जाणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनाही आदित्य ठाकरेंनी टोला लगावलाय.

‘अयोध्येला दर्शनासाठी जाणार’

आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत विचारलं असता आपण लवकरच अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. संजय राऊत आणि आपली याबाबत कालच चर्चा झाली. अयोध्या दौऱ्याची तारीख काय असावी, याबाबत राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

नवनीत राणा, रवी राणा यांना टोला

दुसरीकडे हनुमान चालीसा पठणावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचणारच असा निर्धारच राणा दाम्पत्याने जाहीर केलाय. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता मी त्यांच्याकडे पाहतही नाही, असा टोला लगावला.

राज ठाकरेंवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज हनुमान जयंतीनिमित्त महाआरती होणार आहे. तसंच राज ठाकरे हनुमान चालीसा पठण कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपल्या काकांना टोला हाणला. पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही. हिंदुत्व आमच्या मनात आणि रक्तात आहे, असंही ते म्हणाले.

तर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील जयश्री जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. त्यावरुन कुणाला पोटदुखी होऊ नये. आम्ही एक एक राज्य जिंकणार, असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

इतर बातम्या :

Kolhapur North By Election : कोल्हापुरात एका पाटलांची सरशी तर दुसऱ्या पाटलांची पिछेहाट! 2019 पासूनचं गणित काय सांगतं?

Hanuman Chalisa Politics : तर ‘मातोश्री’ रावणाची लंका होईल, राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; हनुमान चालीसा पठणाचाही निर्धार