Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! राज ठाकरेंचा 16 एप्रिलला दौरा, सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जात आहेत. इतकंच नाही तर राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

Raj Thackeray : पुण्यातील राजकीय वातावरण तापणार! राज ठाकरेंचा 16 एप्रिलला दौरा, सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Image Credit source: TV9
प्रदीप कापसे

| Edited By: सागर जोशी

Apr 14, 2022 | 11:09 PM

पुणे : मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. त्याचबरोबर मशिदींवरील भोंग्यांसमोर (loudspeaker on Mosque) लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच त्यांनी मनसैनिकांना दिलेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात येतेय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जात आहेत. इतकंच नाही तर राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

पुण्यातील वातावरण तापणार

राज्यातील राजकारण तापलेलं असताना आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून मनसेवर जोरदार हल्ला चढवला जात असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा घोषित करण्यात आलाय. राज ठाकरे 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खालकर चौक मारुती मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार असून, मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आणि कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्यात अशाप्रकारचा सामुहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम

ठाण्यातील उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध केला. राज्य सरकारला इशारा देत राज ठाकरे म्हणाले की, येत्या 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला माझी विनंती आहे की, कुठचीही तेढ, दंगल आम्हाला करायची नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे. 3 मेपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या मशिदींच्या मौलवींना बोलवा. त्यांची बैठक घ्या. त्यांना सांगा.. लाऊडस्पीकर उतरवा. 3 तारखेपर्यंत आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. जर 3 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाही तर आम्ही हनुमान चालिसा सुरू करू.

इतर बातम्या :

Nitin Gadkari on RSS : रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रुग्णालय, नितीन गडकरींनी सांगितला एक खास किस्सा

Kirit Somaiya : ‘महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उद्या उघड करणार’, सोमय्या कोणता बॉम्ब फोडणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें