नितीन गडकरी तात्काळ राजीनामा द्या…; नव्या मागणीने एकच खळबळ, मोठं काहीतरी घडणार?
कोकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता एका विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याने नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधक रस्त्ये व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी पुढे सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलयुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे असा आरोप केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना, “नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे सर्वसामान्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉलपुक्त डिझेल आणि पेट्रोल देत असताना गाड्यांची एका बाजूला वाट लावली, तर दुसरीकडे इथेनॉल निर्माण करणाऱ्या कंपनीने वारेमाप पैसा हा कमावलेला आहे.”
“नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा”
पुढे ते म्हणाले, “एकीकडे हा भ्रष्टाचार आहे, तर दूसरीकडे नागरिकांना छळणं आहे. त्यामुळे या देशामध्ये एक मोठा स्कैंडल हे इथेनॉलच्या अनुषंगाने झालेल आहे आणि या इथेनॉलच काड करणारा दुसरा-तिसरा व्यक्ती कोणी नसून मोदी सरकारमधील एक मत्री आहे. त्यामुळे मोदींनी देशातील तमाम वाहनधारकांना, ज्याची वाहने गेल्या दिवसांमध्ये अत्यंत खराब झालेली आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर क्षती झालेली आहे. अशा सर्वांची माफी मागावी व नितीन गडकरींनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.”
“महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत. मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचे? हे अमित शहा ठरवतात. महाराष्ट्रात जेव्हा धुसफूस सुरू होते, तेव्हा सर्वजण दिल्ली दरबारात जातात. शिंदे नेहमी सांगतात की मला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. मात्र, आता दोन वर्षाचा कालावधी उलटला. त्यामुळे जुन्या शब्दांची आठवण करून देण्यासाठी शिंदे सुद्धा दिल्लीला गेले असतील. पंतप्रधान यांचे स्वप्न सुद्धा अनेकांना पडायला लागले आहे. त्यात देवाभाऊ सुद्धा मागे नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी कोण आणायचे यासाठी एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम अमित शहा करू शकतात”, असे देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.