नाना पटोले म्हणाले, आम्ही स्वबळाचा शब्द दिलाय, आता दिल्लीतील काँग्रेस नेत्याची मोठी घोषणा

| Updated on: Jun 25, 2021 | 3:39 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (Congress Maharashtra in charge H K Patil) यांनी मोठं विधान केलं आहे.

नाना पटोले म्हणाले, आम्ही स्वबळाचा शब्द दिलाय, आता दिल्लीतील काँग्रेस नेत्याची मोठी घोषणा
Congress H K Patil Rahul Gandhi
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर, ते महत्त्वाच्या बैठकीसाठी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (Congress Maharashtra in charge H K Patil) यांनी मोठं विधान केलं आहे. “आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ”, असं पाटील म्हणाले. (After Nana Patole Congress Maharashtra in charge H K Patil said we will contest local body election on own )

एच. के. पाटील म्हणाले, “नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसचे समर्थन कायम राहिल आणि सरकार पाच वर्ष टिकणार”

तीन पक्ष एकत्र, ऑपरेशन लोटस चालणार नाही

हिडन ऑपरेशन लोटसबद्दल मला माहिती नाही, मात्र आम्ही तीन पक्ष सोबत आहोत, त्यामुळे हे हिडन लोटस ऑपरेशन महाराष्ट्रात चालणार नाही, असं एच के पाटील यांनी नमूद केलं.

नाना पटोले तातडीने दिल्लीत 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून काल 24 तारखेला दिल्लीला रवाना झाले. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.  आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर (Congress) लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव येथे स्वबळाचा पुनरुच्चार केला होता.

संबंधित बातम्या   

काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही, नाना पटोलेंचा निर्धार

आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना     

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल