काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल

काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?, अशा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विचारला आहे. (Congress individually Contest Election Why Shivsena Are jealous Says Sanjay Nirupam)

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या सुरात भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्यानंतर संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनीही सूर मिसळला आहे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?, अशा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विचारला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Congress individually Contest Election Why Shivsena Are jealous Says Sanjay Nirupam)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून सतत स्वबळाचा सूर लावला आहे. काँग्रेस इथून पिढच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची वक्तव्ये ते वारंवार करत आहेत. त्यांना काही काँग्रेस नेते साथ देत आहेत, तर काही नेते मात्र स्वबळाच्या नाऱ्यामुळे नाराज आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकारमध्ये काँग्रेसचे जवळपास डझनभर मंत्री असूनही स्वबळाची भाषा कशाला, अशी भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची माहिती आहे. या सगळ्या प्रकरणावर बोलताना निरुपम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

काय म्हणाले संजय निरुपम?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकला चलो रे या घोषणेवर मी सहमत आहे. कॉँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. जर काँग्रेस स्वबळावर लढत असेल, तशी इच्छा असेल तर शिवसेनेला, किंवा त्यांच्या प्रक्षप्रमुखांना मिरची झोंबायचे कारण नाही, असं निरुपम म्हणाले.

कोरोना काळात मुख्यमंत्री आणि आणि आदित्य ठाकरेंपेक्षा राहुल गांधींचं काम जास्त

सामना अग्रलेखात राहुल गांधी फक्त ट्विटरच्या माध्यमातून उपक्रम राबवतात असे छापून आले होते. पण मला संजय राऊतांना सांगायचंय की कोरोना काळात मुख्यमंत्री आणि आणि आदित्य ठाकरेंपेक्षा राहुल गांधींचं काम जास्त आहे, अशी टीका निरुपम यांनी केली.

पटोले दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना, स्वबळाच्या भाषेवर मंथन?

नाना पटोले (Nana Patole) नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

(Congress individually Contest Election Why Shivsena Are jealous Says Sanjay Nirupam)

हे ही वाचा :

आधी स्वबळाची भाषा, आता दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा टोला

आंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला, पण हाकेच्या अंतरावरील मोदींनी साधी भेटही घेतली नाही : नाना पटोले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI