नगर-धुळ्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अखेर थंडावला आहे. उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. उद्या या दोन्ही शहरातील मतदार आपली मतं देतील आणि पुढील सत्ताधारी ठरवतील. अहमदनगर महापालिका निवडणूक […]

नगर-धुळ्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला, उद्या मतदान
Follow us on

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अखेर थंडावला आहे. उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. उद्या या दोन्ही शहरातील मतदार आपली मतं देतील आणि पुढील सत्ताधारी ठरवतील.

अहमदनगर महापालिका निवडणूक

अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडवल्या असून उद्या 9 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. तर मतदारांना प्रलोभन दाखवले जाऊ नये, धमकावले जाऊ नये, पुढील काळात पैसे वाटप होऊ नये, यासाठी आता प्रभागनिहाय एकूण 23 पथके तैनात करण्यात आली आहेत. कुणी उमेदवार मतदारांना प्रलोभन दाखवत असल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना त्यावर तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत शहरात ‘ड्राय डे’ जाहीर॒ करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला बंदोबस्त :

  • अप्पर पोलीस अधीक्षक – 2
  • पोलीस अधीक्षक – 6
  • पोलीस निरीक्षक – 22
  • उपपोलिस निरीक्षक – 85
  • पोलीस कर्मचारी – 1000
  • होमगार्ड – 500
  • एसआरपीएफ जवान – 150
  • आरसीपी जवान – 150

73 इमारतीत 367 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील केडगाव, सारसनगर आणि मुकुंदनगर येथील 11 इमारतीतील 41 केंद्र अतिसंवेदनशील आहेत, तर 137 संवेदनशील आहेत.

त्याचबरोबर, निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून निवडणूक यंत्रणेची सर्व सज्जता झाली आहे, तसेच 337 मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले सुमारे 2 हजारांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तर निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.

अहमदनगरमध्ये कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?

  • भाजप – 68
  • शिवसेना – 64
  • राष्ट्रवादी-काँग्रेस – 64
  • मनसे – 14
  • बसपा – 9
  • आप – 8
  • कम्युनिस्ट पार्टी – 3
  • समाजवादी पक्ष – 4
  • रासप – 4
  • भारिप- बहुजन – 1
  • अपक्ष – 106
  • एकूण – 339