नगर: काँग्रेस फोडणाऱ्या भाजपला मध्यरात्री अडीच वाजता झटका

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर: अहमदनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 6 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे. कारण खासदार पुत्रासह भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करुन मध्यरात्री अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे भाजपने चार जागा निवडणुकीपूर्वीच गमावल्या आहेत. नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पुत्र सुवेंद्र आणि […]

नगर: काँग्रेस फोडणाऱ्या भाजपला मध्यरात्री अडीच वाजता झटका
Follow us on

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर: अहमदनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 6 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला धक्का बसला आहे. कारण खासदार पुत्रासह भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्जांची छाननी करुन मध्यरात्री अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे भाजपने चार जागा निवडणुकीपूर्वीच गमावल्या आहेत. नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचा पुत्र सुवेंद्र आणि सून दीप्ती हे महापालिकेच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्या दोघांचेही अर्ज बाद झाले आहेत. शिवाय सुरेश खरपुडे आणि प्रदीप परदेशी या दोन भाजप उमेदवारांचेही अर्ज बाद ठरले आहेत. दुसरीकडे भाजपशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला आहे.

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!

भाजपच्या सुवेंद्र गांधी यांनी  प्रभाग क्रमांक 11 मधून तर त्यांची पत्नी दिप्ती गांधी यांनी प्रभाग 12 मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर अनुक्रमे गिरीश जाधव आणि संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता. अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरत गांधींवर आरोप करण्यात आले होते. त्याबाबत दुपारी सुनावणी झाल्यानंतर या अर्जावरील निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आज पहाटे 2.30 वाजता दोघांचे अर्ज बाद ठरवण्यात आले.

श्रीपाद छिंदमला फायदा?

अर्ज बाद झाल्यामुळे याचा फायदा श्रीपाद छिंदमला होण्याची शक्यता आहे.  या निवडणुकीत अहमदनगरचा माजी उपमहापौर आणि भाजपने हकालपट्टी केलेला नेता श्रीपाद छिंदम अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्याने भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली खरी, पण त्याच्याविरोधात आता भाजपचा उमेदवारच नसल्याचे चित्र आहे.

छिंदमविरोधात भाजपकडून प्रदीप परदेशी रिंगणात होते. पण परदेशी यांचा अर्ज बाद झाल्याने आता छिंदमविरोधात भाजपचा उमेदवारच नसेल. त्यामुळे अर्थात याचा फायदा छिंदमला होणार आहे. यावरुनच नगरच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे.

 कोणाकोणाचे अर्ज बाद?
खासदारपुत्र सुवेंद्र गांधी (भाजप)
खासदारांची सून दीप्ती गांधी (भाजप)
सुरेश खरपुडे (भाजप)
प्रदीप परदेशी (भाजप)
विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
योगेश चिपाडे (राष्ट्रवादी)

भाजपने काँग्रेसचे 6 नगरसेवक फोडले

अहमदनगर महापालिकेची रणधुमाळी सुरु आहे.  इथे काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे एक दोन नव्हे तर तब्बल 6 विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सहाही नगरसेवकांना भाजपने उमेदवारीही दिली. चक्क कोतकर परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.  त्यामुळे काँग्रेसच्या सुजय विखेंना हा धक्का आहे.

महानगरपालिकेत सत्ता कोणाची?

अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 तर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 इतकी आहे. नगर पालिकेत 17 प्रभागात 68 वार्ड आहेत.

आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे महापौर झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळता, शिवसेना नेहमी शहरात वरचढ राहिलेली आहे. तर भाजपादेखील एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या ताकदीने रिंगणात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. शिवाय त्यानंतर लगेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे नगरकरांसह राज्याचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या  

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!