एमआयएमची उमेदवार यादी जाहीर, ‘वंचित’सोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह कायम

| Updated on: Sep 22, 2019 | 6:40 PM

सोलापुरातील सांगोला मतदारसंघातून एमआयएमने अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूल शब्दी, सोलापूर दक्षिण मधून सुफिया तौफिक शेख, तर पुणे कँटोनमेंट मधून हीना शफिक मोमीन यांना रिंगणात उतरवलं आहे.

एमआयएमची उमेदवार यादी जाहीर, वंचितसोबतच्या आघाडीवर प्रश्नचिन्ह कायम
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करण्याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसतानाच एमआयएमने आपली उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List) जाहीर केली आहे. पुणे कँटोनमेंट, सांगोला, सोलापूर मध्य आणि दक्षिण या चार मतदारसंघातून एमआयएमने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

सोलापुरातील सांगोला मतदारसंघातून एमआयएमने अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूल शब्दी, सोलापूर दक्षिण मधून सुफिया तौफिक शेख, तर पुणे कँटोनमेंट मधून हीना शफिक मोमीन यांना रिंगणात उतरवलं आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या संमतीने ही उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List) जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे. आतापर्यंत एमआयएमने सात उमेदवार जाहीर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ‘आप’ने आपल्या उमेदवाराची घोषणा याआधीच केली होती. मुस्मिल बहुल असलेल्या या मतदारसंघात ‘आप’ने अॅडव्होकेट खतीब यांना उमेदवारी निश्चित केली आहे. एमआयएमकडून फारुक शब्दी रिंगणात उतरत आहेत. सोलापूर दक्षिणमधून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात सुफिया तौफिक शेख मैदानात असतील.

एकाच मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे अकरा वेळा निवडून येण्याचा मान पटकावणारे शेतकरी कामगार पक्षाचे 93 वर्षीय आमदार गणपतराव देशमुख यांच्याविरोधात अॅड. शंकर भगवान सरगर निवडणुकीला उतरणार आहेत. शेकापचे अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यंदा ते निवडणूक लढवणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे.

एमआयएमकडून पुन्हा एकदा वंचितसोबत आघाडीचे संकेत

एमआयएमची उमेदवार यादी (AIMIM Maharashtra Vidhansabha Candidate List)

253. सांगोला (सोलापूर) – अॅड. शंकर भगवान सरगर
249. सोलापूर शहर मध्य – फारुक मकबूल शब्दी
251. सोलापूर शहर दक्षिण – सुफिया तौफिक शेख
214. पुणे कँटोनमेंट – हीना शफिक मोमीन (अनुसूचित जातींसाठी राखीव)

विद्यमान आमदारांना तिकीट मिळाल्यास अशी लढत होईल

पुणे कँटोनमेंट – दिलीप कांबळे (भाजप) vs हीना शफिक मोमीन (एमआयएम)
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस) vs फारुक मकबूल शब्दी (एमआयएम)
सोलापूर शहर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप) vs सुफिया तौफिक शेख (एमआयएम)
सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप) vs अॅड. शंकर भगवान सरगर (एमआयएम)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा
निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.