बसू द्या, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, शेजारी बसणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांच्या टिचक्या

अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचेही पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं (Ajit pawar on Chandrakant patil)  आहे.

बसू द्या, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, शेजारी बसणाऱ्या चंद्रकांतदादांना अजित पवारांच्या टिचक्या
| Updated on: Dec 28, 2019 | 2:53 PM

पुणे : पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली (Ajit pawar on Chandrakant patil)  आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. या बैठकीमध्ये अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचेही पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं (Ajit pawar on Chandrakant patil)  आहे.

जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार अध्यक्षस्थानी येऊन बसले. यानंतर काही वेळाने चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि ते अजित पवारांच्या बाजूला जाऊन बसले. त्यावेळी अजित पवारांनीही “बसू द्या, आमच्या शेजारी, त्यांचं आमच्यावर प्रेम आहे.” असं गिरीश बापट यांच्याशी हातवारे करत (Ajit pawar on Chandrakant patil)  म्हणाले.

या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारीही उपस्थिती होते. यावेळी जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा नियोजन करण्यात आले.

या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले. “माझे इतर अनेक नेत्यांशी प्रेमाचे संबंध आहेत. तसेच ते अजित (Ajit pawar on Chandrakant patil)  पवारांसोबतही आहेत.”