‘स्टेपनी’च्या हाती ‘स्टिअरिंग’, बारामतीत उद्धव ठाकरेंचं सारथ्य अजितदादांकडे

| Updated on: Jan 16, 2020 | 11:50 AM

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित 'कृषिक' या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते

स्टेपनीच्या हाती स्टिअरिंग, बारामतीत उद्धव ठाकरेंचं सारथ्य अजितदादांकडे
Follow us on

बारामती : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘स्टेपनी’ म्हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र अजितदादांकडे थेट स्टिअरिंग व्हील दिलं आहे. आमच्या सत्तेचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असा खुशखुशीत डायलॉग उद्धव ठाकरेंनी बारामती दौऱ्यात (Ajit Pawar Drives for Uddhav Thackeray) मारला.

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित ‘कृषिक’ या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख या सोहळ्याला उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राचं कार्यालय पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले. त्यानंतर फोटोसेशन झालं. तेव्हा, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

पवारांच्या घरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे, बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीत उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवारांचंही स्वागत झालं. राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीत हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे.

मुख्यमंत्री बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. हे प्रदर्शन 19 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.

अजित पवार स्टेपनी, आमची गाडी घसरणार नाही : संजय राऊत

‘कृषिक’ हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाते. या प्रात्यक्षिकांची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे या प्रदर्शनात करणार आहेत.

हा कार्यक्रम शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शास्त्रज्ञ, राज्यकर्ते आणि धोरणकर्ते अशा तीन घटकांचा एकत्रित संगम साधून त्याद्वारे शाश्वत शेतीबाबत निर्णय घेण्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्यात येणार असल्याचं राजेंद्र पवार यांनी सांगितलं. Ajit Pawar Drives for Uddhav Thackeray