पवारांच्या घरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे, बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच बारामतीत येणार आहेत. शारदानगर येथील ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या 'कृषिक' या शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

पवारांच्या घरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे, बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी
Follow us
| Updated on: Jan 14, 2020 | 4:05 PM

बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या राजकीय प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच बारामतीत येणार आहेत. शारदानगर येथील ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीत हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे, पवार कुटुंबियांच्या संस्थेनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

येत्या 16 जानेवारीला गुरूवारी सकाळी 9 वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी ठाकरे हे बारामतीतील अद्ययावत शेती तंत्राची तसेच शेतीच्या नवीन तंत्राचा अवलंब केलेल्या शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करणार आहेत. हे प्रदर्शन 19 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, इस्त्राईलचे राजदूत व आंतरराष्ट्रीय धोरण सल्लागार डॅन अलुफ या प्रदर्शनाच्या उदघाटनास उपस्थित राहणार आहेत.

बारामती तालुक्यात शारदानगर येथे होणारे ‘कृषिक’ प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रदर्शन आहे. जगभरातील नवनवे तंत्रज्ञान येथील शेतीच्या प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते. या प्रात्यक्षिकांची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे या प्रदर्शनात करणार आहेत. त्यानंतर येथे आयोजित जाहीर सभेत ते उपस्थित शेतकरी गटांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रात होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं शास्त्रज्ञ, राज्यकर्ते आणि धोरणकर्ते अशा तीन घटकांचा एकत्रित संगम साधून त्याद्वारे शाश्वत शेतीबाबत निर्णय घेण्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्यात येणार असल्याचं राजेंद्र पवार यांनी सांगितलं.

बारामतीत उच्चस्तरीय बैठक

उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी सकाळी 8 वाजता शारदानगर येथे महत्वपूर्ण उच्चस्तरीय संशोधक बैठक होणार आहे. केंद्रीय शेती संशोधन भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. माई, राज्याचे कृषी प्रधान सचिव डॉ.एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, बायरचे आशिया प्रमुख डॉ. सुहास जोशी, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, भारतीय कृषी संशोधन परीषदेचे माजी महासंचालक डॉ.ए.के. सिंग, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, राहूरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, नागपूरच्या म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पाथुरकर यांच्यासह राज्य व देशातील 100 हून अधिक संशोधक या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील शेतीच्या भविष्याबाबत चर्चा होऊन त्यातील शिफारशींचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर होणार आहे.

CM Uddhav Thackeray On Baramati Tour

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.