अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात

| Updated on: Oct 08, 2021 | 1:24 PM

माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय.

अजित पवार खोटं बोलतात, जरंडेश्वर सारख कारखाना व्यवहारावरुन शालिनी पाटलांचा घणाघात
अजित पवार, शालिनी पाटील
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि व्यक्तींवर आयकर विभागानं छापेमारी केलीय. अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. (Shalini Patil alleges that Ajit Pawar is lying in Jarandeshwar case)

जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन कारखाना ताब्यात घेतला आहे. आयकर विभागानं माझ्याकडून लेखी स्वरुपात तक्रार अर्ज घेतलेला आहे. दे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अजितदादांवर आयकर विभागाच्या ज्या धाडी पडल्या आहेत, त्या जरंडेश्वरसाठीच पडल्या आहेत. न्यायालयात माझी लढाई सुरुच आहे. साखर कारखान्यांचे भागधारक शेतकरी आहेत. त्यांना न्यायालयाकडून न्याय मिळणार, असंही शालिनी पाटील यांनी म्हटलंय.

साखर कारखाना लिलावात काढायची गरज नव्हती. कारखाना बुडीत नव्हता. आठ कोटीच्या ठेवी होत्या. त्यातून तीन कोटीची रक्कम फेडता आली असती. यांना कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी आता केंद्र सरकारनं आणि निवडणूक आयोगानं बंदी घातली पाहिजे, असंही पाटील म्हणाल्या.

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, सोमय्यांचं आव्हान

अजित पवार हे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी राजकारण करत आहेत. पण त्यांनी अर्थकारणावर बोलावं. किती कारखाने घेतले? किती भागधारक आहेत? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी केलाय. मी जरंडेश्वर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. खरा मालक, चालक आणि लाभार्थी अजित पवारांना माहिती आहे, असा दावा सोमय्यांनी केलाय. तसंच अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीनं विकत घेतल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी संबंध काय?

अजित पवार यांनी तुरुगांत असलेल्या जरंडेश्वर कारखान्याच्या मालकाशी काय संबंध आहेत हे स्पष्ट करावं. गुरु कमोडिटी यांना कारखाना खरेदीसाठी कुणी मदत केली? ओमकार बिल्डरला पैसे कुणी दिले? जरंडेश्वर कारखाना 40 वर्षासाठी लिजवर दिला. अजित पवार आणि शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं. घोटाळा लपवण्यासाठी वेगळी दिशा दिली जात आहे. संजय राऊत, मिलिंद नार्वेकरांकडून अजित पवारांनी शिकावं. दारामागून दाऊन ईडीच्या कार्यालयात दंडाची रक्कम भरली, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

इतर बातम्या :

मला भाजपने ईडीची नोटीस दिली, लोकांनी भाजपला येडी ठरवली : शरद पवार

VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले

Shalini Patil alleges that Ajit Pawar is lying in Jarandeshwar case