VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर घणाघातील टीका केली आहे. (supriya sule slams bjp over raid on ajit pawar related companies)

VIDEO: दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही; सुप्रिया सुळेंनी ठणकावले
supriya sule


ठाणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. त्यावरून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर घणाघातील टीका केली आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला ठणकावले.

सुप्रिया सुळे आज ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी ठाण्यात नवरात्री निमित्त देवीचा आरती केली. यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला. ज्यांच्यावर धाडी टाकण्यात आल्या. ते नुसते दादांचे नातेवाईक नाहीत. आमचे देखील नातेवाईक आहेत. आमची जॉइंट फॅमिली आहे. आमचं एक कुटुंब आहे. संघर्ष करणे ही पवारांची खासियत आहे. दिल्लीने कितीही त्रास दिला. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्ली पुढे झुकणार नाही आणि झुकलाही नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशात सूडाचे राजकारण

सध्या देशात सूडाचे राजकारण सुरू आहे. आम्ही कधी असे राजकारण केलं नाही. कधीही करणार नाही. आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. हीच आमची संस्कृती आहे, असं त्यांनी सांगितलं.

नवरात्र माझी आई

माझ्यासाठी नवरात्र खूप महत्त्वाचा आहे. माझी आई कधी उपवास वगैरे कधी करत नाही. पण नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. शांताबाई पवार नऊ दिवस उपवास करायच्या. तीच प्रथा माझ्या आईने पुढे सुरू ठेवली आहे. त्यामुळे माझ्यासाठी नवरात्र म्हणजे माझी आई आहे. घटस्थापनेच्या दिवशी मंदिर उघडलं त्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार. जनतेमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातवरण आहे. पण सरकारने जे नियम आखून दिलेला आहेत त्या नियमाचे पालन करावे, असं आवाहनही त्यांनी केलं.

पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर-ऑफिसवर छापे

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

संबंधित बातम्या:

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी

VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले

 पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला  

(supriya sule slams bjp over raid on ajit pawar related companies)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI