पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला

पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 10:18 AM

पुणे : पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.

मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 26 तासांपासून छापेमारी सुरु आहे. 7 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे.

पार्थ पवार यांचे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सीईट्री नावाचे कार्यालय आहे. या इमारतीत 7 ते 8 जणांची टीम छापेमारी करत आहे. काल 12 तास आयकर विभागाने चौकशी केली होती.

अजित पवारांची प्रतिक्रिया दरम्यान, अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. आयकरच्या छापेमारीवर अजित पवार म्हणाले, “पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन. जे सत्य आहे ते उघड होईल”

पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर छापा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.

काय आहे प्रकरण?

अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या 

अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर दिवसभर धाडी, दिल्लीतून जारी करण्यात आलेली आयकर विभागाची प्रेस नोट जशीच्या तशी

VIDEO | तराफ्याचे इंजिन बंद, भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले

होय, माझ्याही कंपन्यांवर आयकरने धाडी टाकल्या : अजित पवार

मोठी बातमी ! पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.