मला भाजपने ईडीची नोटीस दिली, लोकांनी भाजपला येडी ठरवली : शरद पवार

शरद पवार म्हणाले, "अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं.

मला भाजपने ईडीची नोटीस दिली, लोकांनी भाजपला येडी ठरवली : शरद पवार
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 1:00 PM

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात चांगलीच टोलेबाजी केली. “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल”, असं शरद पवार म्हणाले.

पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशी शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर शरद पवारांनीही भाष्य केलं.

 लोकांनी भाजपला येडं ठरवलं 

शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता  अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

केंद्र सरकारवर हल्लाबोल 

महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

VIDEO : शरद पवार यांचं भाषण

संबंधित बातम्या 

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं, शरद पवारांची हाक

पाहुणे घरात आहेत, त्यांचं काम सुरु आहे, ते गेल्यावर भूमिका मांडतो, आयकर धाडीवर अजित पवारांचा टोला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.