या तर मीडियातील बातम्या, तुमचे सोर्सेस काय, हे मला कळू शकणार नाही, अजितदादांचे पत्रकारांना टोले

| Updated on: Feb 11, 2021 | 2:14 PM

आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत बातमी नाही, या बातम्या मीडियातील आहेत, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Cabinet reshuffle)

या तर मीडियातील बातम्या, तुमचे सोर्सेस काय, हे मला कळू शकणार नाही, अजितदादांचे पत्रकारांना टोले
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

मुंबई : खातेवाटपाबद्दल आमच्यात थोडीशीच काय, तसूभरही चर्चा नाही. त्यामुळे तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही, असा मिश्किल टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. अजितदादांच्या जनता दरबारानंतर पत्रकारांनी ठाकरे सरकारमधील खातेवाटपाचा प्रश्न विचारला. तेव्हा या बातम्या मीडियातील आहेत असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. (Ajit Pawar reacts on Thackeray Government Cabinet reshuffle)

खातेवाटप हा अधिकार तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आहे. तिन्ही नेते यासंदर्भाचा निर्णय घेतील. हा निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. राज्य स्तरावर काम करणारे माझे सहकारी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यापैकी आमच्या कुणाच्या कानावर खातेवाटपाबाबत बातमी नाही, या बातम्या मीडियातील आहेत, तुमचे सोर्सेस काय आहेत, ते मला कळू शकणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजितदादांचा आवाज चढला

ठाकरे सरकारनं राज्यपाल कोश्यारींना हवाई वाहतूक करण्याची परवानगी नाकारली आणि महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला. त्याच वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी गाठलं. त्यांना ह्या प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांचा आवाज चढला.

राज्यपाल कोश्यारींवर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं. ते कुठं व्यस्त होते हेही त्यांनी सांगितलं. मंत्रालयात जाऊन पूर्ण माहिती घेतो आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो असंही अजित पवार म्हणाले. त्यानंतर इतर काही प्रश्नांवर त्यांनी उत्तरं दिली. काही प्रश्न झाल्यानंतर अजित पवारांना पुन्हा एका पत्रकारानं राज्यपाल प्रकरणावरच प्रश्न केला. त्यावेळेस मात्र अजित पवारांचा आवाज चढला. (Ajit Pawar reacts on Thackeray Government Cabinet reshuffle)

राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांना भेटल्यानंतर त्यांनी वीज बिलावरुन यू टर्न घेतला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. “या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात” अशी टीका राज ठाकरेंचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!

केवळ बातम्या होण्यासाठी शरद पवारांवर टीका; अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

(Ajit Pawar reacts on Thackeray Government Cabinet reshuffle)