केवळ बातम्या होण्यासाठी शरद पवारांवर टीका; अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. त्यात चर्चा काय झाली माहिती नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं, असं राज ठाकरे म्हणाले होते (Ajit Pawar Raj Thackeray Sharad Pawar)

केवळ बातम्या होण्यासाठी शरद पवारांवर टीका; अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांना भेटल्यानंतर त्यांनी वीज बिलावरुन यू टर्न घेतला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. “या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात” अशी टीका राज ठाकरेंचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अमरावतीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Ajit Pawar reacts on Raj Thackeray statement about Sharad Pawar meeting Adani)

“वास्तविक पाहता पवार साहेबांचा या राज्याशी 60 वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे पवार साहेब असं कधीच करू शकत नाहीत. केवळ बातम्या होण्यासाठी काही जण शरद पवारांवर टीका करतात” असं अजित पवार म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

“वीज कंपन्यांना फायदा झाला नाही, नफा झाला नाही म्हणून जर सरकार नागरिकांना पिळणार असेल तर कसं होईल? पहिल्यांदा वीज मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही वीज दरात कपात करु. नंतर एकदम घुमजाव झालं. मी राज्यपालांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो.” राज ठाकरे म्हणाले होते.

“शरद पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने पत्र लिहून मला ते पत्र पाठवा. मग त्या कंपन्यांमध्ये अदानी, एमएसईबी असेल किंवा टाटा असेल त्यांच्याशी शरद पवार बोलणार होते. मात्र, 5-6 दिवसांनी असं कळलं की अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. त्यात चर्चा काय झाली माहिती नाही. त्यानंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारणं गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं होतं.

अमरावतीत पाच जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक

अमरावतीत पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अंगणवाडी पीएससी जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आदींसाठी सुविधा उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधीची तरतूद करण्यात येत आहे. (Ajit Pawar reacts on Raj Thackeray statement about Sharad Pawar meeting Adani)

31 मार्चच्या आधी तसा शासन निर्णय जाहीर होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. निधी वितरण खर्च यात सुस्पष्टता राहण्यासाठी आयपस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. माहिती सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्यातील हॅलो सहा महसूल विभागातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी जिल्ह्याची निवड करण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहन म्हणून पंचवीस ते तीस कोटी रुपये अतिरिक्त महसूल देण्यात येणार आहे. निधीचा संपूर्ण विनियोग करणे अखर्चित निधी शिल्लक न राहणे अनुसूचित जाती जमाती यासाठीच्या निधीचा पूर्ण विनियोग करणे आदी निकष त्यासाठी ठरवले आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल

आधी वीज बिल माफ करु म्हणाले, अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेल्यावर नाही म्हणाले : राज ठाकरे

(Ajit Pawar reacts on Raj Thackeray statement about Sharad Pawar meeting Adani)

Published On - 3:37 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI