अजित पवार म्हणतात, “नगरची जागा आम्हीच लढू”, मग सुजय विखेंचं काय?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुणे : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, नगरच्या जागेबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुठलाच खुलासा केला नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे दक्षिण नगरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील रस्सीखेच सुरुच असल्याचे दिसून येत […]

अजित पवार म्हणतात, “नगरची जागा आम्हीच लढू”, मग सुजय विखेंचं काय?
Follow us on

पुणे : दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, नगरच्या जागेबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुठलाच खुलासा केला नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे दक्षिण नगरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील रस्सीखेच सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे इच्छुक आहेत. मात्र, आघाडीत परंपरागत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. त्यामुळे सुजय विखेंना आघाडीतून तिकीट हवं असल्यास, काँग्रेसच्या वाट्याला ही जागा येणं अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवरील आपला दावा सोडत नाही. त्यामुळे सुजय विखे पाटलांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

सुजय विखे पाटील हे लोकसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, कोणत्या पक्षातून लढणार, हे काही स्पष्ट होताना दिसत नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे. आघाडीच्या एकत्रित प्रचारसभांनाही सुरुवात झाली आहे. मात्र, दक्षिण नगरच्या जागेचा तिढा काही सुटताना दिसत नाही. परंपरेने राष्ट्रवादीच्या यादीत असलेला हा मतदारसंघातून यंदा सुजय विखेंसाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. मात्र, राष्ट्रवादी काही जागा सोडण्यास तयार असल्याचे दिसत नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही, दक्षिण नगर मतदारसंघाबाबतचा आघाडीतल तिढा सुटता सुटत नसल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही जागा सुजय विखेंसाठी म्हणजेच पर्यायाने काँग्रेससाठी सोडली जाणार की, आपला बाणा कायम ठेवत राष्ट्रवादी स्वत:च लढणार, हे येत्या काळात कळेलच. मात्र, सुजय विखेंसाठी दक्षिण नगरची जागा सोडली नाही, तर नगरमध्ये नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.