AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकडे म्हणाले ठाकरेंची घुसमट होतेय, अजितदादा म्हणतात, बोलणाऱ्याची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा

संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला (Ajit Pawar taunts Sanjay Kakade)

काकडे म्हणाले ठाकरेंची घुसमट होतेय, अजितदादा म्हणतात, बोलणाऱ्याची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा
अजित पवार, संजय काकडे, उद्धव ठाकरे
| Updated on: May 07, 2021 | 3:02 PM
Share

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे, असा दावा करणारे भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनुल्लेखाने फटकारलं. “त्या व्यक्तीची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा” अशा शब्दात अजितदादांनी संजय काकडेंना टोला लगावला. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते. (Ajit Pawar taunts BJP Leader Sanjay Kakade in Pune over statement on CM Uddhav Thackeray)

अजित पवार काय म्हणाले?

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी संजय काकडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले. “मी पुण्यात आहे. ज्या व्यक्तीने हे स्टेटमेंट केलं, त्याची विश्वासार्हता किती आहे हे पुणेकरांना विचारा. अशा वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही” म्हणत अजित पवारांनी विषय बदलला.

संजय काकडे काय म्हणाले होते?

संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं, की मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही काकडे म्हणाले होते.

प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

दरम्यान, संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कालच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी हे मोठं विधान करून खळबळ उडवून दिली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ajit Pawar taunts Sanjay Kakade)

संजय काकडे कोण आहेत?

संजय काकडे हे भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले होते. यंदा मात्र काकडेंना भाजपकडून राज्यसभेवर स्थान देण्यात आले नाही. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. संजय काकडे यांचे सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत. भाजप प्रवेशापूर्वी अजित पवार यांच्याशी काकडेंचे जवळचे संबंध होते.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

उद्धव ठाकरेंची आघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील; संजय काकडेंचा बॉम्बगोळा

(Ajit Pawar taunts BJP Leader Sanjay Kakade in Pune over statement on CM Uddhav Thackeray)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.