28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र

28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र

नवी दिल्ली : येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करा, नंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाही, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकप्रकारे लोकसभा निवडणुकांच्या घोषणांबाबत संकेत दिले आहेत.

निवडणूक आयोगाने नेमकं काय केले आहे?

केंद्रीय निवडणूक आयोगने देशभरातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले आहे की, येत्या 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत सर्व बदल्या पूर्ण कराव्यात. कारण, 28 फेब्रुवारीनंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाहीत. तसेच, बदल्यांचे अहवाल निवडणूक आयोगने मागितले आहे.

वाचा — तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, आता सरकारला फक्त एकच महिना काम करायला मिळणार आहे. लवकरच आचारसंहितेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

एकंदरीत केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या घोषणांचे संकेत दिले आहेत. आधीच देशभरात लोकसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सुरु झाला आहे, विविध राजकीय पक्षांनी हालचाली वेगवान केल्या आहेत, अशा आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस प्रशासनाला पाठवलेल्या पत्रावरुन, लवकरच निवडणुकींची घोषणा होण्याची शक्यता बळावली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI