AMC Election 2022, ward 20 : अकोला मनपात भाजपला वंचितसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आव्हान, प्रभाग क्रमांक 20 चं चित्र काय राहणार?

| Updated on: Aug 17, 2022 | 4:25 AM

अकोला मनपा प्रभाग 20 अ मध्ये अनुसूचित जाती, प्रभाग 20 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 20 क मध्ये सर्वसाधारण जागा राखीव आहे.

AMC Election 2022, ward 20 : अकोला मनपात भाजपला वंचितसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आव्हान, प्रभाग क्रमांक 20 चं चित्र काय राहणार?
Follow us on

अकोला : पश्चिम विदर्भात भाजपनं पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलंय. अकोला हे सर्व चळवळींचे केंद्र ठरले आहे. भाजप आणि संघाच्या मुशीत तयार होणाऱ्या अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला. अमरावती आणि अकोल्यावर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय. अमरावतीत खासदार डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde), आमदार श्रीकांत भारतीय, तर अकोल्यात खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre), बुलडाण्यात डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने नवीन सत्ता समीकरण राबविण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. सहकारी बँका (Cooperative Banks) बुलडाणा, खामगाव, अकोला पट्ट्यात आहेत. शैक्षणिक संस्थांचेही जाळे आहे. अकोला मनपा निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा पालिकेचा प्रवास राहिला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला राबविले. त्यात ते यशस्वीही झाले. 80 पैकी 48 जागांवर ताबा मिळविण्यात आला.

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 20 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 20 ची लोकसंख्या व आरक्षण

अकोल्यात पूर्वी 20 प्रभाग होते. आता 30 प्रभाग आहेत. अकोला महापालिका प्रभाग क्रमांक 20 ची लोकसंख्या 16 हजार 42 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 5 हजार 940 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 153 आहे. अकोला महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या 91 राहणार आहे. त्यापैकी 46 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 15 जागा राखीव राहणार आहेत. त्यापैकी 8 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या दोन जागा आहेत. त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 24 जागा आहेत. त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटासाठी 50 जागा आहेत. त्यापैकी 25 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. अकोला मनपा प्रभाग 20 अ मध्ये अनुसूचित जाती, प्रभाग 20 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 20 क मध्ये सर्वसाधारण जागा राखीव आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग 20 मध्ये भाजपनं चारही जागा जिंकल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 20 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

अकोला मनपा प्रभाग 20 ची व्याप्ती

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व खंडवा हिंगोली रेल्वे लाईनचे संगमापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ने पूर्वेकडे सुलाई बुद्ध विहारपर्यंत तेथून पुढे कुंभारी रस्त्याने नवीन बायपासचे संगमापर्यंत पुढे बायपास ओलांडून शिवणी 59 च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत शिवणीच्या पूर्व हद्दीने तेथून पुढे दक्षिण हद्दीने शिवणीच्या पूर्व उत्तर कोपऱ्यापर्यंत. पूर्वेस शिवणीच्या पूर्व उत्तर कोपऱ्यापासून दक्षिणेकडे शिवणीच्या पूर्व हद्दीने शिवणीच्या दक्षिण पूर्व हद्दीचे संगमापर्यंत. खंडवा हिंगोली रेल्वे लाईन व येवता रस्त्याचे संगमापासून पश्चिमेकडे येवता रस्त्याने नवीन बायपास संगमापर्यंत तेथून पुढे खंडवा हिंगोली रेल्वे लाईनने येवता खंडवा हिंगोली रेल्वे लाईनचे संगमापर्यंत तेथून पुढे खंडवा हिंगोली रेल्वे लाईनने येवता रोडवरील न्यू गणेश भाजी भंडार व जनरल स्टोअर्सकडून येणाऱ्या संगामापर्यंत.

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 20 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष