Maharashtra Politics : जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही, अमेय खोपकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका

| Updated on: Apr 12, 2022 | 9:34 AM

"कुमार आदित्यजी ठाकरे (Aaditya Thackeray), आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही.आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही" असं ट्विट अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंनी परवा संपलेल्या पक्षांवरती मी वक्तव्य करीत नाही असं म्हटलं होतं.

Maharashtra Politics : जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही, अमेय खोपकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका
अमेय खोपकर यांची आदित्य ठाकरेंवर टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – “कुमार आदित्यजी ठाकरे (Aaditya Thackeray), आम्ही राजसाहेबांचे मनसैनिक…जनतेशी निष्ठा संपलेल्या पक्षाला आम्ही किंमत देत नाही.आणि तुमच्यासारखे भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही” असं ट्विट अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरेंनी परवा संपलेल्या पक्षांवरती मी वक्तव्य करीत नाही असं म्हटलं होतं. त्याला अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे. मला असं वाटतं ज्यांची निष्ठा जनतेशी संपलेली आहे. त्यांनी अशा गोष्टीमध्ये पडू नये, आपलं वय नाही. आत्ता भ्रष्टवादीमध्ये शिवसेना (Shivsena) आली, राष्ट्रवादी आली आणि कॉंग्रेसपण आली. हे काय आम्हाला शिकवतात राजकारण, आणि आमचा पक्ष संपलाय ही का आमच्या टीका करताय. तुम्ही पहिलं स्वत:स्वत:चं धोतर सांभाळा असं टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवरती केली.

सभेची ठाण्यात जय्यत तयारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्यानंतर जी उत्तर सभा ठाण्यातील गडकरी रंगायतन जवळील मुस रोड या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ठाणे शहरातील अनेक ठिकाणी मनसेनेच्या वतीने झेंडे आणि बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. भोंग्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शहरात विरोधकांना करारा जबाब मिलेंगा आशा विविध प्रकारचे बॅनर शहरात लागले आहेत. आजच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं कोणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना सभेत उतर मिळेल

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेले भाषण भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. पण मनसे स्थापनेपासून केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी याआधीही ते सर्व मुद्दे घेतले होते. हे सर्वांना पुराव्यासह पटवून देणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हिडीओ’ संकल्पना लक्षवेधी ठरली होती. ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून त्यावेळी राज ठाकरेंनी मोदी सरकारवर साधला होता निशाणा. राज ठाकरे यांची आजची ठाण्यातली सभा विरोधकांसाठी ही उत्तर सभा आहे. लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेत नक्की उतर मिळेल. वसंत मोरे यांनी आपली नाराजी दूर झाल्याचं म्हटलं आहे. मराठी आमची श्वास आहे दुसऱ्या भाषेत ट्विट करत नाही, संजय राऊत मराठीचा गजर करतात आणि शेर मात्र हिंदीत लिहितात अशी टिका संदीप देशपांडेंनी राऊतांवरती केली.

Sujat Ambedkar Video | दंगल पेटवायची असेल तर आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवा, सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना चॅलेंज

IPL 2022 Purple Cap : यजवेंद्र चहल विकेट घेणाऱ्यां यादीत अव्वल, पर्पल कॅपसाठी हे गोलंदाज दावेदार

IPL 2022 CSK vs RCB Live Streaming: जाणून घ्या चेन्नई विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?