AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 CSK vs RCB Live Streaming: जाणून घ्या चेन्नई विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आयपीएल-2022 (IPL 2022) स्पर्धेतील 22 वा सामना मंगळवारी (12 एप्रिल) खेळवला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super kings) हा संघ जबरदस्त फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) दोन हात करणार आहे.

IPL 2022 CSK vs RCB Live Streaming: जाणून घ्या चेन्नई विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022 CSK vs RCB Live StreamingImage Credit source: Twiter / RCB / CSK
| Updated on: Apr 12, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : आयपीएल-2022 (IPL 2022) स्पर्धेतील 22 वा सामना मंगळवारी (12 एप्रिल) खेळवला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज(Chennai Super kings) हा संघ जबरदस्त फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी (Royal Challengers Bangalore) दोन हात करणार आहे. हे दोन्ही संघ नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर भिडणार आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह मैदानात उतरले आहेत. यावेळी चेन्नईचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीऐवजी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं आहे, तर आरसीबीची कमान विराट कोहलीऐवजी दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा खेळाडू फाफ डू प्लेसिसकडे आहे. चेन्नईसाठी यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही. सीएसकेने चार सामने खेळले आहेत आणि त्या चारही सामन्यात यलो पलटनचा पराभव झाला आहे. तर बँगलोरचा संघ चांगल्या स्थितीत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्स 10 व्या स्थानावर आहे. तर आरसीबीने चालू हंगामातील चारपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि एका सामन्यातत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली यंदाच्या मोसमात बँगलोरचा संघ खूपच मजबूत दिसत आहे. अशा स्थितीत सध्याचा फॉर्म पाहता मंगळवारी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात आरसीबीचं पारडं थोडं जड दिसत आहे.

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना 12 एप्रिल (मंगळवार) रोजी खेळवला जाणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल.

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना कधी सुरू होईल?

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल.

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : ऑरेंज कॅपवर जॉस बटलरची पकड कायम, पर्पल कॅपचा मानकरी युझवेंद्र चहल

IPL 2022 Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा मानकरी; लखनऊच्या चार महत्त्वाच्या विकेट घेतल्या

IPL 2022 SRH vs GT Live Streaming: जाणून घ्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.