Eknath Shinde: बंडखोर आमदारांच्या बैठकीत अमित शाह? नेमकं काय आश्वासन दिलं? सामनाच्या संपादकीयमध्ये ‘प्रहार’

| Updated on: Jun 28, 2022 | 12:06 PM

राज्याच्या राजकारणात सर्वकाही घडवूनही यामध्ये आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून भासवण्यात आल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला आहे. याचा दाखला देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खा. रावसाहेब दानवे यांची परस्पर विरोधी मतांच्या विधानांचे उदाहऱण देण्यात आले आहे. एकीकडे चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षात काय सुरु आहे तो त्यांचा पक्षांतर्गतचा विषय आहे. त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगत असले तरी दुसरी गुडघ्याला बाशिंगबांधून खा. दानवे तयार असल्याचाही आरोप कऱण्यात आला आहे.

Eknath Shinde: बंडखोर आमदारांच्या बैठकीत अमित शाह? नेमकं काय आश्वासन दिलं? सामनाच्या संपादकीयमध्ये प्रहार
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गृहमंत्री अमित शाह यांनी बंडखोर आमदारांशी संवाद झाल्याचा दावा केला जात आहे.
Follow us on

मुंबई :  (Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात जे दिसतंय तेवढचं घडतयं असं नाही तर पडद्याच्या मागे अनेक घडामोडी घडत आहेत. शिवाय या सर्वाच्या मागे (BJP) भाजपाचा डाव असल्याचा आरोप शिवसनेच्या माध्यमातून केला जात आहे. सर्वकाही ज्ञात असून या पक्षातील नेतेमंडळी वेगवेगळी विधाने करुन जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेनेत जे सुरु आहे त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे तीन-चार दिवसांमध्ये भाजप सत्तेमध्ये येईल असे मत खा. रावसाहेब दानवे यांनी केले आहे. तर तिकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (Home Minister Amit Shah) गृहमंत्री अमित शाह यांनी बंडखोर आमदारांशी संवाद साधून अपात्रतेबाबत कारवाई तर होऊच देणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त प्रहारमध्ये प्रकाशित झाल्याने हे पाप महाराष्ट्र स्वीकारेल का असा सवाल आता सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व घटनेशी आपला संबंध नसल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत असले तरी पडद्यामागची पोलखोल सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आली आहे.

भाजप नेत्यांची विधाने बुचकळ्यात टाकणारी

राज्याच्या राजकारणात सर्वकाही घडवूनही यामध्ये आपला काही संबंध नसल्याचे भाजपाकडून भासवण्यात आल्याचा आरोप सामनामधून करण्यात आला आहे. याचा दाखला देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खा. रावसाहेब दानवे यांची परस्पर विरोधी मतांच्या विधानांचे उदाहऱण देण्यात आले आहे. एकीकडे चंद्रकांत पाटील हे शिवसेना पक्षात काय सुरु आहे तो त्यांचा पक्षांतर्गतचा विषय आहे. त्याच्याशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगत असले तरी दुसरी गुडघ्याला बाशिंगबांधून खा. दानवे तयार असल्याचाही आरोप कऱण्यात आला आहे. म्हणूनच तीन-चार दिवसांमध्ये राज्यात भाजपा सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. असे दाखले देऊन राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथी कुणामुळे होत आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न सामना मधून करण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांसोबत बैठक अन् बंडखोरांचा आत्मविश्वास

बंडखोर आमदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रकाशित केले होते. त्याचाच हवाला देत सामनामधून टिकास्त्र सोडण्यात आले आहे. बंडखोरांच्या अपात्रेबाबत निश्चिंत रहावा अशी कारवाई होऊ देणार नसल्याचा विश्वास शाह यांनी बंडखोर आमदारांना दिल्याने त्याचा आत्मविश्वास दुपटीने वाढला. एवढेच नाहीतर बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा देखील पुरवली जाणार असल्याचा विश्वास या बैठकीत शाह यांनी दिल्याने त्यांच्यामागे मोठी शक्ती उभा राहिल्याचा आरोप कऱण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

गुवाहटीमधील मुक्काम वाढणार

राज्यातील सत्तेची समीकरणे पूर्णपणे स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत या बंडखोर आमदारांचा गुवाहटीमधील मुक्काम वाढणार आहे. या बंडखोरांमध्ये 8 मंत्री देखील आहेत. मात्र, आपल्या विभागाचा कारभार वाऱ्यावर सोडून ते स्वार्थासाठी दुसऱ्या राज्यात मुक्कामी गेल्याचा घणाघात सामना मधून करण्यात आला आहे. एवढेच नाहीतर शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेऊन ते तत्वाच्या गोष्टी करीत असल्याचा खेदही सामनामधून व्यक्त केला आहे. एकंदरीत बंडखोरांच्या मागे कोण आहे याचा उहापोह सामनाच्या संपादकीयमधून मांडण्यात आला आहे.