अमित शहांची प्रकृती पुन्हा बिघडली, कोलकात्याहून दिल्लीला परतले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

कोलकाता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे ते पश्चिम बंगालहून दिल्लीला परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीमुळे ते पश्चिम बंगालच्या झारग्राम येथील सभेत सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. मंगळवारी कोलकाता येथील सभेदरम्यानही त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं दिसत होतं. शहांनी भर तापात सभेला संबोधित केले ‘अमित शहा खूप आजारी आहेत. त्यांना ताप […]

अमित शहांची प्रकृती पुन्हा बिघडली, कोलकात्याहून दिल्लीला परतले
Follow us on

कोलकाता : भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे ते पश्चिम बंगालहून दिल्लीला परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीमुळे ते पश्चिम बंगालच्या झारग्राम येथील सभेत सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. मंगळवारी कोलकाता येथील सभेदरम्यानही त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं दिसत होतं.

शहांनी भर तापात सभेला संबोधित केले

‘अमित शहा खूप आजारी आहेत. त्यांना ताप आहे. तरिही त्यांनी मंगळवारच्या सभेत सहभाग घेतला’, अशी माहिती पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.

डॉक्टरांनी शहांना सध्या कुठल्याही सभेत सहभागी होण्यास मनाई केली आहे, त्यामुळे त्यांना मंगळवारीच दिल्लीला परत जावं लागलं, असंही दिलीप घोष यांनी सांगितलं. तर शहांच्या अनुपस्थितीत सर्व सभा वेळेवर व्हाव्या याची दक्षता बाळगण्यास शहांनी सांगितल्याचं घोष म्हणाले.

स्वाईन फ्लू झाल्यानंतरही घेतल्या सभा

काहीच दिवसांआधी अमित शहांना स्वाईन फ्लू झाला होता. याची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यांच्या छातीत दुखत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथे उपचारानंतर दोन दिवसांनी डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली होती.

आजारानंतर लगेच घेतली सभा

अमित शहा यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर लगेच पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारांचा कार्यक्रम होता. डॉक्टरांच्या सांगण्यावरुनच ते या सभांमध्ये सहभागी झाले होते. मालदा इथे त्यांनी सभेला संबोधित केले. मात्र भाषणानंतर अमित शहांची प्रकृती बिघडली.

अमित शहा यांना मालदानंतर झारग्राम येथे आयेजित सभेत सहभागी व्हायचे होते. मात्र प्रकृती बिघडल्याने आता ते या सभेला संबोधित करु शकणार नाहीत. शहा या सभेत सहभागी होणे शक्य नाही. खालावलेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना कुठल्याही सभेत सहभागी होण्यास मनाई केल्याचं भाजप नेत्याने सांगितलं.