अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र, राज्यपालांचीही भेट घेणार

| Updated on: Jun 22, 2020 | 9:40 AM

इतर राज्यांत 'आशा' स्वयंसेविकांना दर महिन्याला चार हजार ते दहा हजार रुपये इतका मोबदला मिळत आहे, मग महाराष्ट्रात अशी स्थिती का, याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र, राज्यपालांचीही भेट घेणार
Follow us on

मुंबई : ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार आहेत. (Amit Thackeray writes to Ajit Pawar Rajesh Tope on ASHA worker pay)

“परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशा’ स्वयंसेविकांना दर महिन्याला चार हजार ते दहा हजार रुपये इतका मोबदला मिळत आहे.” याकडे अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

“आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.
त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.” अशी माहिती अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.

हेही वाचा : अमित ठाकरेंची आणखी एक मागणी मान्य, बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ

“आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही” अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी अमित ठाकरे यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळत त्यांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली होती.

संबंधित बातम्या :

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला   

(Amit Thackeray writes to Ajit Pawar Rajesh Tope on ASHA worker pay)