“प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाचे धडे घ्या”, अमोल कोल्हे आक्रमक

| Updated on: Dec 04, 2022 | 3:31 PM

अमोल कोल्हे यांची आक्रमक प्रतिक्रिया...

प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाचे धडे घ्या, अमोल कोल्हे आक्रमक
Follow us on

मुंबई : भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर, बालपण रायगडावर! तुम्हाला चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात घेण्याची गरज आहे”, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणालेत.

अध्यक्ष महोदय,माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.. अन्यथा आम्हाला तरी सांगावे की हा इतिहास कुठे शिकावा, कुणी सांगावा? टीपः- हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

निषेध किंवा धिक्कार करणे पालथ्या घड्यावर पाणी आहे.. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार!, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा निषेध केलाय.

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होतोय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लाड यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.