AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 फेब्रुवारीला लाँच होणार गुगलचा ‘हा’ परवडणारा 5जी फोन, जाणून घ्या त्याची डिझाइन, फिचर्स

गुगलने जाहीर केले आहे की त्यांचा नवीन 5जी फोन जो सर्वांना परवडणाऱ्या किमतीत 18 फेब्रुवारीला लाँच करणार आहेत. तर या फोनची डिझाइन व फिचर्स कसे असणार आहे ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

18 फेब्रुवारीला लाँच होणार गुगलचा 'हा' परवडणारा 5जी फोन, जाणून घ्या त्याची डिझाइन, फिचर्स
Google Pixel 10aImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Feb 06, 2026 | 10:44 AM
Share

गुगल कंपनीने त्यांचा नवीन 5जी स्मार्टफोन जो की परवडणाऱ्या किमतीत लवकरच या महिन्याच्या अखेरीस लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. Google Pixel 10a असे या स्मार्टफोनचे नाव असून हा फोन भारत आणि जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे. मार्च 2025 मध्ये सादर झालेल्या Pixel 9a चा हा सक्सेसर असण्याची अपेक्षा आहे. तर या आगामी हँडसेटच्या डिझाइनबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत तसेच डिझाइन व फिचर्स कसे असणार आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात.

Google Pixel 10a लाँच तारीख

गुगलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर घोषणा केली आहे की Pixel 10a हा स्मार्टफोन 18 फेब्रुवारीला लाँच होईल. टेक जायंटने अद्याप किंमत जाहीर केलेली नसली तरी, गुगल स्टोअरच्या ग्राहकांनी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 29 मिनिटांपर्यंत माहितीसाठी साइन अप केल्यास त्यांना विशेष ऑफरचा लाभ घेता येईल. तर यावेळी कंपनीने Pixel 10a खरेदीसह भविष्यातील ऑर्डरवर लाभ घेण्यासाठी ही ऑफर वापरली जाऊ शकते.

मागील मॉडेलसारखेच डिझाइन

Google Pixel 10a ची डिझाइन ही Pixel 9a या फोनसारखीच असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये एक फ्लॅट ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल.

या फोनच्या मागील बाजूस सिंगल LED फ्लॅश असण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या पिक्सेल 9ए प्रमाणेच, आगामी पिक्सेल 10ए मध्येही मागील पॅनेलच्या मध्यभागी सेंटर-अलाइन केलेले गुगल ब्रँडिंग असण्याची अपेक्षा आहे.

डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर या फोनच्या डिस्प्ले भोवती जाड बेझल दिसू शकते, तर मध्यभागी अलाइन्ड होल-पंच कटआउट देखील आढळू शकतो. कंपनीने फोनची एक टीझर इमेज शेअर केली आहे, ज्यामध्ये पिक्सेल 10a निळ्या रंगात दिसत आहे, जो त्याच्या मागील मॉडेलच्या आयरिस रंगासारखा दिसतो.

स्पेसिफिकेशनबद्दल अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही गुगलने आगामी नॉन-फ्लॅगशिप पिक्सेलचे स्पेसिफिकेशन उघड केलेले नाही, परंतु कंपनी या फोनला त्याला आतापर्यंतचा सर्वात टिकाऊ गुगल पिक्सेल ए-सिरीज फोन म्हणत आहे, ज्यामध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारात सुधारणा दिसून येते.

पिक्सेल 9ए प्रमाणे, पिक्सेल 10ए मध्येही जेमिनी बिल्ट-इन एआय असिस्टंट असण्याची अपेक्षा आहे. कंपनी हा फोन भारतात 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करण्याची अपेक्षा आहे. यामुळे हा गुगलचा नवीनतम सिरीजमधील सर्वात परवडणारा 5जी फोन ठरू शकतो.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार