AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीने चेहरा बदलला, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा, उदयनराजे स्टार कॅम्पेनर

मुख्यमंत्र्यांची  महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा (NCP Shiv Swarajya Yatra) काढणार आहे.

राष्ट्रवादीने चेहरा बदलला, अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा, उदयनराजे स्टार कॅम्पेनर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 31, 2019 | 2:34 PM
Share

मुंबई :  मुख्यमंत्र्यांची  महाजनादेश यात्रा आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवस्वराज्य यात्रा (NCP Shiv Swarajya Yatra) काढणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.  याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत.  शिवस्वराज्य यात्रेला 6 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून होणार आहे. रोज 3 विधानसभा मतदारसंघ कव्हर करणार आहेत.  पहिला टप्पा हा जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे संपेल.

16 ऑगस्ट रोजी या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा तुळजापूर येथून सुरू होईल आणि या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. विशेष  म्हणजे या संपूर्ण यात्रेची मदार युवक राष्ट्रवादी काँग्रेसवर सोपवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेची ग्रॅण्ड तयारी भाजपने केली आहे. या यात्रेच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे.  भाजपची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून सुरु होत आहे.

संबंधित बातम्या 

उद्घाटनाला अमित शाह, समारोपाला मोदी, फडणवीसांची महाजनादेश यात्रा 

Follow Us
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?