
मुंबई : संभाजीनगरमधील दंगल ही राष्ट्रवादीचं कटकारस्थान होतं, अशी टीका भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केली. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, अनिल बोंडे ही व्यक्ती नसून विकृती आहे. अमरावती शहरात या व्यक्तीने दंगली भडकवण्याचं पाप केलं. यावरून ही व्यक्ती किती विकृत असली पाहिजे हे सर्व अमरावतीकरांना माहीत आहे. अनिल बोंडे बाहेरून जितके विषारी आहेत, तितकेच आतूनही विषारी आहेत. त्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य वाटत नाही.
दिल्लीच्या औरंगजेबाच्या सैन्याला संताजी आणि धनाजींचे घोडे पाण्यात दिसायचे. तसे आताच्या दिल्लीस्वराच्या सुलतानाला राष्ट्रवादी काँग्रेस पाण्यामध्ये दिसते. अनिल बोंडे ही व्यक्ती नाही मी खासदार म्हणून पाहत नाही. अमरावतीकरांना माहीत आहे की, ती विकृती आहे, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला.
अनिल बोंडे यांनी आजपर्यंत जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे पाप केले. अनिल बोंडे यांना मागच्या शिवव्याख्यानात त्यांची लायकी दाखवून दिली. अनिल बोंडे यांची लायकी आणि कुवत तितकीचं आहे.
भिमा कोरोगावची दंगली झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. आता या दंगली घडतात. कोणीही महाराष्ट्रात येतो. संतांचा अपमान करतो. ते असक्षम असतील. त्यांच्या कारभारावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत असेल. तर त्याचं समाधानकारण उत्तर गृहमंत्री फडणवीस यांनी द्यावं.
अनिल बोंडे हे गृहमंत्र्यांचे चमचे आहेत का ते सांगावे. चापलूसी करून तुम्हाला राज्यसभेवर खासदारकी मिळाली. आणखी किती चमचेगिरी करणार आहात. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पद सांभाळण्यात अपयशी आहेत का, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं.
अमोल मिटकरी म्हणाले, सरकार तुमच्या हाती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल कोणी घडवली हे तिथल्या लोकांना माहीत आहे. अनिल बोंडे यांच्यासारखी लोकं जाणीवपूर्वक जातीमध्ये तेढ निर्माण करतात. मुस्लीम द्वेष पसरवतात. जाणीवपूर्वक हिंदूंच्या मुलांना पेटवतात, असा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला. तुमच्या हातात सरकार आहे. छत्रपती संभाजीनगर प्रकरणी एसआयटी लावा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असं आव्हानंही त्यांनी दिलं.